Women’s World Cup 2022 : भारताने अकराव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली!

Women’s World Cup 2022 :  भारताने अकराव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट महिला विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताने पाकिस्‍तानचा पराभव करत दमदार सुरुवात केली. टीम इंडियाने पाकिस्‍तानचा तब्‍बल १०७ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने ५० षटकांमध्‍ये २४४ धावा केल्‍या. स्‍मृति मंधानाने ५२, दीप्‍ति शर्मा ४०, पूजा वस्‍त्रकर ६७ तर स्‍नेह राणाने ५३ धावांची खेळी केली. पाकिस्‍तानचा संपूर्ण संघ ४३ षटकांमध्‍ये १३७ धावांवर बाद झाला. भारतीय महिलांनी पाकिस्‍तानचा वन डेमध्‍ये सलग ११व्‍यांदा पराभव केला आहे.

पाकिस्‍तानच्‍या सिदरा अमीन हिने सर्वाधिक ३० धावा केल्‍या. तर भारताच्‍या राजेश्‍वरी गायकवाडने उत्‍कृष्‍ट गोलंदाजी करत १० षटकांमध्‍ये ३१ धावा देत चार विकेट घेतल्‍या. झूलन गोस्‍वामी आणि स्‍नेह राणा या दोघींनी प्रत्‍येकी दोन तर मेघना आणि दीप्‍तिने प्रत्‍येकी एक बळी घेतला.

पाकिस्तान की महिला टीम का विश्व कप में रिकॉर्ड बेहद खराब रहा है। टीम 16 मार्च 2009 से लेकर अब तक विश्व कप में 15 मैच खेल चुकी है और सभी में हार का सामना करना पड़ा है।

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतला दुसऱ्याच षटकांत पहिला झटका बसला. शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. मात्र, दीप्ती ४० धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोलमडला. एका बाजूने संयमी फलंदाजी करत असलेल्या मानधनाने अर्धशतक झळकावले.

स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकारची दमदार फलंदाजी

सलामीवीर स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीनंतर मधल्या फळीतील स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांनी दमदार फलंदाजी करत सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केल्याने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पाकिस्तानकडून डायना बेगने ३ विकेट घेतल्या, फातीमा सानाने दोन, तर अनम अमीन आणि निदा दर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताने अवघ्या १८ धावांत चार फलंदाज गमावले. त्यामुळे १ बाद ९२ वरून भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. मात्र, स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी भारताला डावात परत आणले. दोघींनी अर्धशतकी खेळी केली. स्नेह राणा ५३ धावांवर नाबाद राहिली. पूजा शेवटच्या षटकांतील पहिल्या चेंडूवर ६७ धावांवर बाद झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news