Apple Spring Event : ८ मार्चला ॲपल लाँच करणार नवा फोन आणि आयपॅड | पुढारी

Apple Spring Event : ८ मार्चला ॲपल लाँच करणार नवा फोन आणि आयपॅड

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : जगप्रसिद्ध ॲपल कंपनीचे Apple Spring Event 8 मार्चला होणार आहे. या कार्यक्रमात Iphone 5G SE आणि IPad Air लाँच होण्याची शक्यता आहे. पिक प्रफॉरमन्स या टॅगलाईनने हा कार्यक्रम होणार आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोस्वेक यांनी ही माहिती दिली आहे.

या कार्यक्रमाकडे जगभरातील ॲपल प्रेमींचे लक्ष असेल कारण नवीन मोबाईल हा बजेट फ्रेंडली असण्याची शक्यता आहे. तसेच मॅक मिनी आणि आयपॅड एअरचे नवे व्हर्जन लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲपलची टॅगलाईन लक्षात घेतली तर या प्रॉडक्टमध्ये पॉवरफूल प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत SEच्या सेरिजमध्ये पहिल्यांदाच मोठे बदल होणार आहेत. (Apple Spring Event)

नव्या फोनमध्ये कॅमेरा अतिशय चांगला असण्याची शक्यता आहे. चिप A14 असेल की A15 याबद्दल मात्र उत्सुकता कायम आहे.

Back to top button