russia vs ukraine war : युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जारी | पुढारी

russia vs ukraine war : युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : russia vs ukraine war अखेर जे घडायला नको होते ते घडत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव झुगारुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे आता रशिया – युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडला आहे. युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. पण, या सर्व पार्श्वभूमीवीर अद्याप ही युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय नागरिक व विद्यार्थी तेथेच आहेत. त्यांना माघारी आणण्याची मोहीम युद्धास प्रारंभ झाल्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान युक्रेनमधील भारतीय दुतावासाने तेथील भारतीयांसाठी तिसरी आवश्यक सुचना जारी केली आहे. या सुचनांसंबधी पत्र एएनआयने नुकतेच ट्विटरवरुन शेअर केले आहे.

अद्याप ही युक्रेनमध्ये ( russia vs ukraine war ) १८ हजार भारतीय नागरिक अडकले आहे. काही भारतियांना परत आणण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान पाठविण्यात आले होते. पण, युद्धास प्रारंभ झाल्याने तुर्तास भारतीयांना माघारी आणण्याची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक शहरांमध्ये धुरांचे लोट पाहण्यास मिळत आहेत. या सर्व पार्श्र्वभूमीवर युक्रेन मधील भारतीय दुतावासकडून नागरिकांना सुरक्षित रहाण्या बाबत सुचना करण्यात येत आहेत.

युक्रेनमधील ( russia vs ukraine war ) भारतीय दुतावासाने तेथे अडकलेल्या भारतीयांसाठी तिसरे सुचनापत्र जारी केले आहे. यात दुतावासाने भारतीय नागरिक तसेच विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, जेतके शक्य असेल तितके सुरक्षित स्थळी राहण्याचा प्रयत्न करा, तेथील शहरांमध्ये सुरक्षततेसाठी अंडरग्राऊंड बॉम्ब शेल्टर्स तयार केले आहेत. अशा ठिकाणी त्वरीत पोहचण्याचे आवाहन केले आहे. जेथून सायरनचा आवाज किंवा बॉम्बपासून वाचण्याच्या सुचना करण्याचा घोषणा ऐकू येत आहे या ठिकाणी ही शेल्टर्स आहेत. त्या ठिकाणी ताबडतोब पोहचावे असे आवाहन दुतावासाने केले आहे. या शिवाय नागरिक जर या हल्ल्यात प्रत्यक्ष अडकले असतील तर त्यांना गुगलवर मॅपवर जवळच्या शेल्टर्सची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार जवळच्या शेल्टर्स प्रयत्न पोहचण्याची विनंती देखिल या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, ७२ तासांपूर्वी युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना ( russia vs ukraine war ) एअरलिफ्ट करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले होते. परंतु हल्ले सुरू झाल्यानंतर ते थांबविण्यात आले आहे. युक्रेनमध्ये गेलेले एअर इंडियाचे विमान भारतात परत आल्याचे वृत्त सकाळी आले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय भारतात कसे येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज १८२ भारतीय मायदेशात परतल्याचे सांगितले जात आहे. कीव शहरातून युक्रेन (Ukraine) इंटरनॅशनल एअर लाईन्सचे एक विमान सकाळी ७.४५ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले. या विमानातून १८२ भारतीय नागरिक मायदेशात परत आले. यामध्ये विद्यार्थ्य़ांची सर्वाधिक संख्या आहे

या आधी मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने नवी दिल्लीतून कीव शहराकडे उड्डान केले होते. त्यावेळी धोकादायक वातावरणात २५० भारतीयांना मायदेशात आणण्यात आले.

Back to top button