Russia-Ukraine war : ‘रशिया-युक्रेन युद्धात नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा’ | पुढारी

Russia-Ukraine war : 'रशिया-युक्रेन युद्धात नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये ( Russia-Ukraine war ) लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये १२ बॉम्ब फेकले आणि अनेक गावे ताब्यात घेतली. याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याची विनंती युक्रेनच्या राजदुतांनी केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारताचे रशियासोबतचे संबंध चांगले आहेत. सुमारे २० हजार भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारताने ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याशिवाय युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी तुर्तास युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याची विनंती देखील मोदींना केली आहे. सध्या युक्रेन भंयकर परिस्थितीचा सामना करत आहे.

या पार्श्वभूमीवर कीवमधील भारतीय दूतावासाने एक नवीन सूचना जारी केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना घरीच रहा, शांत आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे म्हटले आहे. ( Russia-Ukraine war )

पुणे : केवळ 3 मिनिटांत मेट्रो होणार चकाचक

या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजार भारतीय नागरिकांनी आहे तिथेच राहावे कारण केंद्र सरकार निवडणूक लढवण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिक : भोंदुबाबाचा महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार

ट्विटमध्ये ‘देशाचे पंतप्रधान युक्रेनमधील नागरिकांची काळजी करण्याऐवजी निवडणुकाच्या प्रचाराच्या रॅलीत बिझी आहेत. त्यांना त्याची काळजी नसल्याचे दिसत आहे. परंतु, आम्ही अडकलेल्या नागरिकासाठी प्रार्थना करत आहोत. ते कधी या संकटातून आपल्या मायदेशी परततील यांची वाट पाहत आहोत. असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button