रशियाचा युक्रेनमध्ये ३० हून अधिक ठिकाणांवर कलीबर क्रुझ क्षेपणास्त्राने हल्ला | पुढारी

रशियाचा युक्रेनमध्ये ३० हून अधिक ठिकाणांवर कलीबर क्रुझ क्षेपणास्त्राने हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियाने युक्रेनच्या (Ukraine) अनेक शहरांवर आज (गुरूवार) क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात ४० हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि १० नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तर प्रती हल्ल्यात युक्रेनने सुमारे ५० रशियन मारल्याचा दावा केला आहे. तसेच पूर्व युक्रेनमध्ये ५ रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचाही दावा केला आहे.

आंतरराष्ट्रीय समूदायाच्या दिलेल्या अत्यंत कडक इशाऱ्यानंतरही रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केली आहे. लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर उभय देशांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनमध्ये नागरी ठिकाणे तसेच लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. रशियाने युक्रेनमध्ये जवळपास ३० हून अधिक ठिकाणी कलीबर क्रुझ क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले केले आहेत.

संयुक्त दलाच्या ऑपरेशनमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले ५ विमान आणि १ हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचे युक्रेन (Ukraine) लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितले. रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. तर युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. राजधानीच्या मुख्य विमानतळाजवळही गोळीबाराचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button