Richa Ghosh : रिचा घोषनं इतिहास रचला; महिला क्रिकेटमध्ये ठोकलं वेगवान अर्धशतक | पुढारी

Richa Ghosh : रिचा घोषनं इतिहास रचला; महिला क्रिकेटमध्ये ठोकलं वेगवान अर्धशतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला टीमची यष्टीरक्षक रिचा घोष (Richa Ghosh) हिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रिचाने न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक परदेशी मैदानावर झळकावले. तिने २६ चेंडूमध्ये ४ चौकार, ४ षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिेकेटमध्ये हा विक्रम तिच्या नावावर नोंद झाला आहे.

बेळगाव : सीमावासीयांवरील अन्यायाविरूद्ध आवाज बनणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

दरम्यान, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रिचा घोष (Richa Ghosh) खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकली नाही. २९ चेंडूमध्ये ५२ धावा करत ती बाद झाली. एक वेळ अशी होती की, ५ एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय टीम आघाडी घेईल, असे वाटत होते. परंतु रिचा बाद झाल्यानंतर भारताच्या साऱ्या आशा संपुष्टात आल्या.

पुणे जि. प. अधिकार्‍यांचा अभ्यास दौरा वादात!

चौथा सामना पावसामुळे २० षटकांचा खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड महिला टीमने २० षटकांत ५ विकेट गमावून १९१ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. एमलिया कैरने ३३ चेंडूत ६८ धावांची निर्णायक खेळी केली. तर सूजी बेट्सने २६ चेंडूत ४१ धावा केल्या. सोफी डिवाइन आणि एमी सैथर्टवेटने प्रत्येकी ३२ धावांची खेळी केली.

ठाणे : समीर वानखेडेंना पोलिसांनी बजावले समन्स

Back to top button