ठाणे : समीर वानखेडेंना पोलिसांनी बजावले समन्स | पुढारी

ठाणे : समीर वानखेडेंना पोलिसांनी बजावले समन्स

ठाणे; पुढारी वृत्तसेवा:  ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्‍यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात त्‍यांना देण्‍यात आले आहेत.

एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे त्यांच्या नावे नवी मुंबईत असलेला हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला हाेता. त्‍यांच्‍याविरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हाही दाखल करण्‍यात आला  हाेता.

वयाच्या १७ व्या वर्षी वानखेडे यांनी नावावर बार परवाना घेतला असल्‍याचे तपासा स्‍पष्‍ट झाले. त्‍यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली हाेती. सतराव्या वर्षी समीर वानखेडे यांना बारचा परवाना मिळाला कसा? असा प्रश्न उपस्थित झाला होता. उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणी चौकशी करीत होते.

उत्पादन शुल्क विभागाने ठाणे प्रशासनाकडे आपला अहवाल सादर केला. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. दरम्यान, वाशी येथील सतगुरु हॉटेल्सच्या लायसन्समध्ये वयाचा पुरावा नसल्याने काही त्रुटी आढळल्या. या प्रकरणी नवी मुंबईत वानखेडेवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याच गुन्ह्यात  पोलिसांनी त्‍यांना समन्स बजावले आहे. त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button