Covid 19 cases : देशात २४ तासांत कोरोनाचे ७१ हजार नवे रुग्ण, १,२१७ जणांचा मृत्यू | पुढारी

Covid 19 cases : देशात २४ तासांत कोरोनाचे ७१ हजार नवे रुग्ण, १,२१७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत याआधीच्या दिवशीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७१,३६५ नवे रुग्ण (new Covid 19 cases) आढळून आले आहेत. तर १,२१७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ७२ हजार २११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ८ लाख ९२ हजार ८२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.५४ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत कोरोनाने ५ लाख ५ हजार २७९ जणांचा बळी घेतला आहे.

याआधीच्या दिवशी ६७ हजार ५९७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार १८८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ८० हजार ४५६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.४६ टक्क्यांवर पोहचला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५.०२ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ८.३० टक्के नोंदवण्यात आला होता.

६७.५ टक्के किशोरवयीन मुलांचे अंशतः लसीकरण

कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण (Covid vaccination) अभियानातून आतापर्यंत १७० कोटी २१ लाख ७२ हजार ६१५ डोस देण्यात आले आहेत. यातील ५५.७८ लाखांहून अधिक डोस सोमवारी दिवसभरात देण्यात आले होता. खबरदारी म्हणून आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना १.५३ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत. १५ ते १७ वयोगटातील ६७.५ टक्के किशोरवयीन मुलांचे अंशतः लसीकरण झाले आहे. आतापर्यंत ५ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हा लसीकरणात आघाडीवर

चंद्रपूर जिल्हयात एका दिवसांत १८९ जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस तर ७४ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याची पहिल्या डोसची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी तर दुसऱ्या डोसची सरासरी ६ टक्क्यांनी जास्त आहे.

दक्षिण कोरियात कोरोनाचा फैलाव

दक्षिण कोरियात कोरोनाचे (Covid 19 cases) रुग्ण वाढत आहेत. येथे ४९,५६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण येथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. हाँगकाँगमध्ये कोरोनाचे नवे १,१६० रुग्ण आढळून आले आहेत.

Back to top button