देशात कोरोना पसरण्यास महाराष्ट्र काॅंग्रेस जबाबदार : पंतप्रधान मोदी

देशात कोरोना पसरण्यास महाराष्ट्र काॅंग्रेस जबाबदार : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : "कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काॅंग्रेसने मर्यादेचा कळस गाठला होता. राजकारण केलं. काॅंग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्रातून कामगारांना रेल्वेचं तिकीट काढून पाठवून दिलं. काॅंग्रेस अफवा परवून अडचणी आणखी वाढविल्या.  त्यामुळे कोरोना परसविण्यास काॅंग्रेस जबाबदार आहे", असा थेट हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत होते. मोदी म्हणाले की, "कोरोना काळात शेतकऱ्यांवर अडचणी येणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेतली. आम्ही शेकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलो. त्यांना सहकार्य केलं. गतिशक्ती योजनेवर काम सुरू आहे. पाच वर्षांत पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक क्षेत्रात उत्पन्न वाढतं आहे. छोट्या उद्योगांसाठी ३ लाखांची मदत करण्यात आली", असंही त्यांनी संसदेत सांगितलं.

"काही लोकांना निर्यातीतील वृद्धी पाहवत नाही. मेक इन इंडिया होणार नाही, ही काॅंग्रेसची भाषा आहे. काॅंग्रेस या योजनेची खिल्ली उडवली. नकारात्मकता पसरविण्याचं काम काॅंग्रेसने केलं आहे. १०० वर्षांत पहिल्यांदाच आलेल्या कोरोना महामारीत महागाई आकाशाला भीडणार नाही, याची आम्ही दक्षता घेतली. २०१४ ते २०२२ पर्यंत महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिला आहे. परावलंबी देश स्वतःची सुरक्षा कधीच करू शकत नाही. भारताने डिफेन्समध्येही निर्यातीची पावलं टाकली आहेत", असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

"पंतप्रधान पंडित नेहरुंनी महागाईवर आपले हात झटकले होते. आज मी वारंवार नेहरुंच्या नावाचा उल्लेख करणार आहे. जे इतिहासातून धडा घेत नाहीत, ते इतिहासातच रमतात. त्यांनी फक्त गरिबीचे नारे दिले, पण गरिबी दूर झाली नाही, ही काॅंग्रेसची दुर्दशा आहे. नागालॅंड, ओडिशामध्ये काॅंग्रेसला नाकारण्यात आलं. तेलंगणाच्या स्थापनेचं श्रेय काॅंग्रेसने घेतलं. पण, तेलंगणाच्या जनतेने काॅंग्रेसला नाकारलं. युपी बिहारमध्ये काॅंग्रेसला मतं नाहीत", अशी टीका काॅंग्रेसवर करून पंतप्रधान मोदींना काॅंग्रेसच्या पराभवाचा पाढाच वाचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news