Owaisi-Shah : ‘असदुद्दीन ओवैसी यांनी झेड सुरक्षा स्वीकारून आमचे ‘टेन्शन’ कमी करावे’ | पुढारी

Owaisi-Shah : 'असदुद्दीन ओवैसी यांनी झेड सुरक्षा स्वीकारून आमचे 'टेन्शन' कमी करावे'

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “असदुद्दीन ओवैसी यांच्यावरील हल्ल्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे आणि त्यांना झेड सुरक्षा प्रकारातील बुलेट प्रूफ चारचाकी देण्याचा निर्णय झालेला आहे.” पण, ओवैसी यांनी सुरक्षा घेण्याचं नाकारलं आहे. (Owaisi-Shah)

राज्यसभेत अमित शहा म्हणाले की, “मी संसदेच्या माध्यमातून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना विनंती करतो की, त्यांनी सुरक्षा घ्यावी.” अमित शहा पुढे म्हणाले की, “३ फेब्रुवारी रोजी औवेसी जेव्हा दिल्ली परतत होते, तेव्हा एका टोल नाक्याशेजारी दोन अज्ञात व्यक्तींना गोळीबार केली. त्यांच्या गाडीवर ती गोळ्या लागल्यांच्या खुणादेखील निदर्शनास आल्या.”

“या प्रकरणात तीन साक्षीदार आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात त्याचा तपास केला जात आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. घटनेच्या साक्षी गोळा केल्या जात आहेत. तर आरोपींची चौकशीदेखील होत आहे”, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. (Owaisi-Shah)

त्याचबरोबर अमित शहा म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आहे. सुरक्षेची अंमलबजावणी कडक केली जात आगेय घटनास्थळाचे निरीक्षण पोलीस अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. जिल्हा नियंत्रण विभागाला ओवैसी यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलेली नव्हती”, अशीही माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत दिली.

पहा व्हिडिओ : गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

Back to top button