fraud : जादूटोण्याची भीती घालून भोंदूबाबाने महिलेला घातला ३२ लाखांचा गंडा | पुढारी

fraud : जादूटोण्याची भीती घालून भोंदूबाबाने महिलेला घातला ३२ लाखांचा गंडा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

एका भोंदूबाबाने जादूटोण्याची ( witchcraft ) भीती दाखवून करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली एका डोंबिवलीतील महिलेला तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांचा गंडा ( fraud ) घातला आहे. या प्रकरणी खारेगाव येथे राहणारी मुलगी आणि डोंबिवली येथे राहणाऱ्या आईची फसवणूक झाल्याची तक्रार मुलीनेच राम नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पवन पाटील (वय २८, शनि चौक, गंजेवाडा, भडगाव, जि. जळगाव ) नावाच्या भोंदूबाबा विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१९ पासून आजतागायत जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या पवन बापुराव पाटील या भोंदूबाबाने तक्रारदार प्रियांका राणे (रा. कळवा – खारेगाव ) यांच्यासह त्यांची आईची (रा. ओम साई सोसायटी, न्यू आरे रोड, डोंबिवली पूर्व ) फसवणूक ( fraud ) केली. प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच या बाबाने कुणीतरी जादूटोणा करून करणी केल्याची भीती पीडित महिलेला घातली होती.

भोंदूबाबाने उकळले ऑनलाईनद्वारे लाखो रुपये ( fraud )

तंत्रमंत्राने करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या भोंदूबाबाने पीडित महिलेच्या व तिच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये ३१ लाख ६ हजार ८७४ रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच आपल्याकडून १ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे या पवन पाटील याने ३२ लाख १५ हजार ८७४ रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button