Bank Holiday Alert : फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार

Bank Holiday Alert : फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बँका १२ दिवस बंद राहतील. याअगोदर जानेवारी महिन्यात १६ दिवस सुट्या होत्या. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश होतो. (Bank Holiday Alert for February 2022)

फेब्रुवारी महिन्यात बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. देशभरातील सर्व बँका संपूर्ण महिन्यात १२ दिवस बंद राहणार नाहीत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. (Bank Holiday Alert for February 2022)

त्यामुळे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला प्रत्यक्ष भेट देण्याचा विचार करत असाल तर सुट्टीची यादी पाहिल्यानंतरच विचार करा. जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात प्रजासत्ताक दिनी बँका बंद राहतील. (Bank Holiday Alert for February 2022)

ही आहे सुट्ट्यांची यादी

  • २ फेब्रुवारी – सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
  • ५ फेब्रुवारी – सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
  • ६ फेब्रुवारी – रविवार
  • १२ फेब्रुवारी – महिन्याचा दुसरा शनिवार
  • १३ फेब्रुवारी – रविवार
  • १५ फेब्रुवारी – मोहम्मद हजरत अली जन्मदिन /लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
  • १६ फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
  • १८ फेब्रुवारी – डोलजात्रा (कोलकात्यामध्ये बँका बंद)
  • १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्रामध्ये बँका बंद)
  • २० फेब्रुवारी – रविवार
  • २६ फेब्रुवारी – महिन्याचा चौथा शनिवार
  • २७ फेब्रुवारी – रविवार

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news