Team India Fined : टीम इंडियाला ICC चा झटका, केली मोठी दंडात्मक कारवाई! | पुढारी

Team India Fined : टीम इंडियाला ICC चा झटका, केली मोठी दंडात्मक कारवाई!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Fined : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर (IND vs SA) पाहुण्या भारतीय संघाला स्लो ओव्हर रेटमुळे 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सामन्याची वेळ लक्षात घेऊन कर्णधार केएल राहुलला समज दिली आणि भारतीय गोलंदाजांनी षटके वेळेत न टाकल्याचे दाखवून दिले. आपली चूक मान्य करत राहुलने शिक्षा स्वीकारली. आता या प्रकरणी कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नसल्याचे समजते.

खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, किमान ओव्हर रेटसाठी उशीरा टाकलेल्या ओव्हर्ससाठी खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या प्रति षटकाच्या 20 टक्के दंड आकारला जातो. जेव्हा संघ दिलेल्या वेळेत गोलंदाजी करू शकत नाही तेव्हा असे घडते. मैदानावरील पंच मारायस इरास्मस आणि बोंगानी जेले, तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच अॅड्रियन होल्डस्टॉक यांनी सामनाधिका-यांकडे टीम इंडियाविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी कारवाई केली. (Team India Fined)

भारतीय संघाला शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या तीन सामन्यांच्या मालिकेत संघाला व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचे लक्ष्य ठेवले, त्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 49.2 षटकांत 283 धावा केल्या आणि संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीसह दीपक चहरने भारतासाठी दमदार अर्धशतक झळकावण्याचा प्रयत्न केला पण तो पुरेसा सिद्ध झाला नाही. (Team India Fined)

Back to top button