राशिभविष्य (दि.२४ जानेवारी २०२२)
राशिभविष्य
मेष : वादविवादात यश मिळेल. सत्याचा विजय होईल. आप्तस्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक प्रगती होईल.
वृषभ : सतत काम काम यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आरामाची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. संयमाने वागावे लागेल.
मिथुन : बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. आत्मपरीक्षणाची गरज.
कर्क : आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल. कला व खेळामध्ये यश मिळवाल.
सिंह : अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता आहे.
कन्या : सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळीची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. आप्तेष्टांच्या बरोबर खरेदीचा आनंद घ्याल.
तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. कशावरही डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.
वृश्चिक : खर्याअर्थाने आनंददायी दिवस जाईल. व्रत-वैकल्यांचा दिवस मानसिक समाधान देईल. आपसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
धनु : प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल.
मकर : आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. प्रवासाचे योग.
कुंभ : कामांचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. श्वसनाचे विकार होण्याची शक्यता.
मीन : जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य