जळगाव : नोकरी लावून देतो अशी बतावणी करुन तब्बल 43 लाखांना घातला गंडा | पुढारी

जळगाव : नोकरी लावून देतो अशी बतावणी करुन तब्बल 43 लाखांना घातला गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने शहरातील एकाची तब्बल 43 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत उत्तर प्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रत्नदीपनगर येथील रहिवासी अनिल पाटील यांच्या नातेवाइकांना ‘भारतीय खाद्य निगम’ येथे नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून तब्बल 43 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चोपडा न्यायालयाच्या प्राप्त आदेशान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा; 

Back to top button