गोव्यात हुडहुडी ;पारा घसरला | पुढारी

गोव्यात हुडहुडी ;पारा घसरला

पणजी, पुढारी वृत्तसेवा: राज्यात थंडीची लाट असून, मंगळवारी किमान तापमान 18.8 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. कमाल तापमान 30.4 अंश डिग्री सेल्सिअस होते. सरासरी तापमान 24 अंश डिग्री सेल्सिअस राहिले.

रविवारपासून तापमान कमी होत गेले आहे. रविवारी कमाल तापमान 28 व किमान 21 अंश सेल्सिअस होते. सोमवारी कमाल तापमान 29 व किमान तापमान 26 अंश डिग्री सेल्सिअस होते. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे बहुतांश नागरिक आरटी-पीसीआर चाचणी करून घेत आहेत. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक थंडी पसरली आहे. सकाळी उशिरापर्यंत धुक्यामुळे रस्ताही दिसत नाही. सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवत असल्यास वाफ घेणे, गरम पाणी पिणे व आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची वाढती स्थिती पाहता गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात 12 ते 15 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी माध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात आणखी एक अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button