Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण | पुढारी

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी ट्विट करुन दिली आहे. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. (Nitin Gadkari)

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरु असताना राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडलेले पाहायला मिळत आहेत. राज्यातील १० मंत्री आणि २२ आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

Nitin Gadkari : नेत्यांना कोरोनाने जाळ्यात अडकवलंय

तसंच देशातील इतरही नेत्यांना कोरोनाने जाळ्यात अडकवलंय. अशातच नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.

सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.

मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे. सध्या मी घरात राहूनच उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

हेही वाचा 

Back to top button