पालखीसाठी बारामतीत 800 शौचालये | पुढारी

पालखीसाठी बारामतीत 800 शौचालये

बारामती: पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू श्री संत तुकाराम पालखी सोहळ्यात स्वच्छता कायम राहावी यासाठी यंदाही निर्मल वारी अभियान राबविले जाणार आहे. बारामतीत सेवा सहयोग फाउंडेशनकडून सोहळा काळात 800 शौचालये उभारली जाणार आहेत. पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्‍यांची सोय व्हावी, गावात स्वच्छता राहावी, रोगराई टळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने गेली काही वर्षापासून निर्मल वारी अभियान राबवले जात आहे.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम बारामती येथे मंगळवारी (दि. 28) आहे. या वेळी बारामती शहर परिसरात 13 ठिकाणी 800 शौचालयांची व्यवस्था करण्यात येत आहे. याचा वापर वारकर्‍यांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही शौचालये कुठे उभारली आहेत याचे मार्गदर्शन करण्यासाठी 250 ते 300 स्वयंसेवक रात्रभर जागे राहून करणार आहेत. बारामतीकरांनी या उपक्रमास शक्य होईल त्याप्रमाणे सहकार्य करावे आणि बारामती स्वच्छ सुंदर ठेवण्यास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

दावडी गावात पडला 50 कोटींचा पाऊस?

जालना : पेरणीच्या तोंडावर खते गायब

बारामतीत कालव्यावरील घाटाचाच वापर करा; जलसंपदा विभागाचे आवाहन

Back to top button