टाळ म्हणे चिपळीला.. नाच माझ्या संगे; गल्लीबोळात विठूनामाचा गजर | पुढारी

टाळ म्हणे चिपळीला.. नाच माझ्या संगे; गल्लीबोळात विठूनामाचा गजर

कात्रज : पुढारी वृत्तसेवा: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाल्यानंतर काही लहान-मोठ्या दिंड्या व वारकरी कात्रज उपनगरात विसावले. भजन-कीर्तनाद्वारे विठू नामाचा गजर झाल्याने परिसर भक्तिमय झाला आहे. नागरिकांनी भजन-कीर्तन व वारकरी सेवेचा आनंद घेतला. कात्रज उपनगरातील सामाजिक संस्था, भजनी मंडळ व सोसायट्या वारकर्‍यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कात्रज गावठाण, भारती विद्यापीठ थोरवे शाळा, कात्रज-कोंढवा रोड माउली गार्डन कार्यालय, शिवपार्वती मंगल कार्यालय, सुखसागरनगर, अब्दुल कलाम जलतरण तलाव, शिवशंभोनगर, गुजरवस्ती अशा ठिकाणी लहान-मोठ्या दिंड्या विसावल्या होत्या. अनेक लहान मोठ्या सोसायट्यांनी वारकर्‍यांची सेवा केली. तसेच अनेक कुटुंबांनी चार-पाच वारकरी आपल्या घरी नेऊन सेवा केली.

हेही वाचा

औरंगाबाद : गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त

एकनाथ शिंदे लवकरात लवकर आसाम सोडा, स्थानिक काँग्रेस प्रदेशाध्यांचा इशारा

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीतील ‘आघाडी’चा प्रयोग टांगणीला; सत्ता बदलल्यास राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला रोख बसणार

Back to top button