चोरीमुळे सोन्याचे कमोड पुन्हा चर्चेत | पुढारी

चोरीमुळे सोन्याचे कमोड पुन्हा चर्चेत

लंडन : सोन्यासारख्या राजधातूचा वापर हल्ली कशासाठी होईल, हे सांगता येणे कठीण झाले आहे. सोन्याचे कमोड म्हणजेच शौचकुपही बनवले जात आहेत! ब्रिटनमध्ये असेच एक सोन्याचे कमोड आहे, जे सध्या चोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले! या कमोडची किंमत आहे तब्बल 50 कोटी रुपये.

2019 मध्ये झालेल्या कला प्रदर्शनात ठेवण्यात आलेले तब्बल 50 कोटी रुपयांचे 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ब्लेनहाईम पॅलेसला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा राजवाडा माजी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान आहे. या राजवाड्यात असलेले 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कला प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

या टॉयलेटची किंमत 4.8 दशलक्ष पौंड म्हणजेच म्हणजे भारतीय चलनात सुमारे 50 कोटी रुपये एवढी आहे. हा आलिशान कमोड प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी बनवला होता. सोन्याचे असलेले हे महागडे टॉयलेट वेलिंगबरो येथील जेम्स शीन नावाच्या व्यक्तीने चोरले होते. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शीनने ऑक्सफर्ड क्राऊन कोर्टात दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा गुन्हादेखील कबूल केला. शीनने यापूर्वी अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. त्याने नॅशनल हॉर्स रेसिंग म्युझियममधून 40,000,00 पाऊंड किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉफीसह अनेक वस्तूंची चोरी केली.

यासाठी त्याने यापूर्वी 17 वेळा तुरुंगवासदेखील भोगला आहे. ऑक्सफर्ड शहराजवळील ब्लेनहाईम पॅलेसच्या आर्ट गॅलरीमध्ये सोन्याचे टॉयलेट काही दिवसांपूर्वी रात्री गायब झाले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रदर्शनाला भेट देणारी व्यक्ती हे शौचालय वापरण्यासाठी 3 मिनिटांसाठी बुक करू शकत होती. सोन्याचे टॉयलेट हा प्रकार केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर चीनमध्येही आहे. 2019 मध्ये हाँगकाँगच्या एका ज्वेलरने शांघायमधील चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये हिर्‍यांनी जडवलेल्या सोन्याच्या टॉयलेटचे अनावरण केले होते. या खास टॉयलेटमध्ये बुलेटप्रूफ काचेची टॉयलेट सीट आहे. त्यात 40,815 छोटे हिरे लावले आहेत. त्यावेळी ते स्वच्छतागृहहीदेखील चोरीला गेले होते!

Back to top button