Himalaya : का आहे हिमालय ‘नो फ्लाय झोन’? | पुढारी

Himalaya : का आहे हिमालय ‘नो फ्लाय झोन’?

नवी दिल्ली : परीक्षा पार पडल्यानंतर पर्यटनाचा ट्रेंड सुरू होईल आणि देशविदेशातील नवनवी ठिकाणे ट्रॅक करण्याची मालिकाही सुरू होईल. देशातही अनेक उत्तमोत्तम पर्यटन स्थळे आहेत आणि त्यात हिमालय देखील आहे. हिमालय ट्रेक करून जरुर पाहता येतो. पण, याचे ट्रेकिंगही इतके अजिबात सोपे नाही. यासाठी वेगळे प्रशिक्षण घ्यावे लागते आणि विविध संकटातून मार्ग काढावा लागतो. अशावेळी विमानातून हिमालय पाहता येईल, असाही विचार काहींच्या मनात चमकू शकतो. पण, असे करणेही शक्य नाही. कारण, हिमालय ‘नो फ्लाय झोन’मध्ये येतो.

याचे कारण असे की, हिमालयाचे हवामान नेहमीच सारखे नसते, ते सतत बदलत असते. बदलते हवामान कोणत्याही विमानासाठी धोकादायक असते. विमानातील हवेचा दाब प्रवाशांनुसार ठेवला जातो. पण, हिमालयाचे हवामान नेहमीच अनिश्चित असते, जे प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हिमालयावरून विमाने उडत नाहीत.
हिमालयीन प्रदेशात नेव्हिगेशन सुविधा देखील उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विमान एअर कंट्रोलशी संपर्क साधू शकणार नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विमानाला जवळच्या विमानतळावर उतरावे लागते, परंतु हिमालयाजवळ कुठेही विमानतळ नाही. अशा परिस्थितीत हिमालयावर विमाने न उडवण्याचे हेही एक मोठे कारण आहे.

हिमालयाची उंची सुमारे 29 हजार फूट आहे आणि एखादे विमान सरासरी 30 ते 35 हजार फूट उंचीवर उडते, अशा स्थितीत हिमालयावरून उड्डाण करणे धोकादायक ठरू शकते. विशेष म्हणजे आणीबाणीच्या वेळी विमानात 20-25 मिनिटेच ऑक्सिजन असतो आणि आपत्कालीन परिस्थितीत विमान केवळ 8-10 हजार उंचीवर उड्डाण करतात जेणेकरून प्रवाशांना ऑक्सिजनची कोणतीही अडचण येऊ नये. यामुळेही हिमालयावरून उड्डाण करणे धोक्याचे ठरू शकते.

Back to top button