‘एआय’ने लावला न्यूरोलॉजिकल सिंड्रोम ‘टेथर्ड कॉर्ड’चा छडा | पुढारी

‘एआय’ने लावला न्यूरोलॉजिकल सिंड्रोम ‘टेथर्ड कॉर्ड’चा छडा

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे अनेक बदल घडत आहेत. त्याचे ताजे उदाहरण आता अमेरिकेतून समोर आले आहे. तिथे राहणार्‍या कर्टनीच्या चार वर्षांच्या मुलाला एक विचित्र आजार जडला आहे. त्याला तीन वर्षे वेगवेगळ्या वेळी सतरा डॉक्टरांना दाखवले, पण त्याच्या वेदनादायक आजाराचे निदान होऊ शकले नाही. अखेर आई कर्टनीने ‘एआय’ टूल ‘चॅटजीपीटी’ची मदत घेतली. त्यामधून हे समजले की, त्याला ‘टेथर्ड कॉर्ड’ हा न्यूरोलॉजिकल सिंड्रोम आहे!

या मुलाचे नाव अ‍ॅलेक्स असे आहे. तो नेहमी वेदनेने विव्हळत असे. प्रत्येक वस्तूला चावण्याचा तो प्रयत्न करी. त्याची उंची वाढणे थांबले होते. त्याच्या शरीराच्या डाव्या व उजव्या भागात असंतुलन दिसत होते. अनेक डॉक्टरांनाही त्याला कोणता आजार आहे हे समजले नाही. त्यामुळे शेवटी कर्टनीनेच आपल्या मुलाचा आजार शोधण्यासाठी चॅटजीपीटीची मदत घेतली.

तिने मुलाच्या एमआरआय नोटस्ना क्रमानुसार चॅटजीपीटीमध्ये प्लग केले. चॅटजीपीटीने नोट केले की लेक्स पालथी मांडी घालून बसू शकत नाही. त्याचे कारण मेंदूच्या संरचनात्मक भागात समस्या असू शकते. त्याने आपल्या निष्कर्षामध्ये सांगितले की, त्याला न्यूरॉलॉजिकल सिंड्रोम ‘टेथर्ड कॉर्ड’ आहे. त्यामध्ये मणका आसपासच्या ऊतींशी जोडलेला असतो. हे निदान झाल्यावर त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तो ठीक होत आहे.

Back to top button