पाकिस्तानच्या अणुबॉम्बला राहुल गांधी यांनीच घाबरावे : अमित शहा

पाकिस्तानच्या अणुबॉम्बला राहुल गांधी यांनीच घाबरावे : अमित शहा

प्रतापगड, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या अणुबॉम्बला राहुल गांधी यांनीच घाबरावे. आम्ही अजिबात घाबरणार नाही. त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यास मोदी सरकार समर्थ आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील जाहीर सभेत सांगितले.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यांचा सन्मान करा, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांची री ओढली होती. त्यांचा अमित शहा यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. पाकिस्तानसमोर झुकण्याची आणि घाबरण्याची वृत्ती काँग्रेसचीच आहे. राहुल गांधी यांनी त्यांना
घाबरावे, असे ते म्हणाले.

काँग्रेस केंद्रात इतकी वर्षे सत्तेवर होती. पण त्यांना अयोध्येत राममंदिर बांधणे शक्य झाले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या पाच वर्षांतच न्यायालयीन लढा जिंकला आणि त्यानंतर प्रत्यक्षात भव्य राम मंदिर साकारले. 22 जानेवारीला या भव्य राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या समारंभाचे निमंत्रण देऊनही सोनिया आणि राहुल गांधी तिकडे फिरकलेही नाहीत, अशी टीका त्यांनी केली. केंद्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news