जर्मनीत मिळाले 2 हजार वर्षांपूर्वीचे इंद्रधनुषी नाणे! | पुढारी

जर्मनीत मिळाले 2 हजार वर्षांपूर्वीचे इंद्रधनुषी नाणे!

बर्लिन : जर्मनीतील एका नदीजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचे दुर्मीळ इंद्रधनुषी नाणे सापडले आहे. या नाण्यांमध्ये 77 टक्के सोने, 18 टक्के चांदी व 5 टक्के तांबे याचे मिश्रण असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. पहिल्या-दुसर्‍या इसवी पूर्व तयार करण्यात आलेल्या या नाण्याच्या एका बाजूला चार नक्षत्र असलेल्या तार्‍याचे डिझाईन आहे.

अन्य इंद्रधनुषी नाण्याप्रमाणेच हे नाणेही गोलाकार असून त्याचे अनोखे डिझाईन हे आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. ही सर्व नाणी म्युनिचमधील बवेरियन स्टेट कलेक्शनकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. या नाण्याच्या एका बाजूला चौरंगी तारा साकारला गेला आहे, असे पुरातत्व खात्यातील वरिष्ठ पदाधिकारी बर्नवर्ड झिएगॉस यांनी म्हटले आहे.

या नाण्यांना इंद्रधनुषी असे नाव का पडले, हे ही रंजक आहे. इंद्रधनुषाचा पृथ्वीवरील अंतिम केंद्रबिंदू असतो, त्या ठिकाणी सोन्याचे अंश पडतात. यातूनच ही नाणी आकारास आलेली असतात, असा झिएगॉस यांचा दावा आहे. आणखी एका अभ्यासकाने ही अशी इंद्रधनुषी नाणी केवळ संडे चिल्ड्रनना किंवा इतरांपेक्षा उज्ज्वल अशा मुलांनाच मिळू शकतात, असा दावा केला. आश्चर्य म्हणजे ही नाणी ज्याला सापडली, त्याचा जन्म रविवारी झाला होता. त्यामुळे ती व्यक्ती सुदैवीच मानायला हवा, असे त्यांनी पुढे म्हटले.

संबंधित बातम्या

आता 1.9 ग्रॅम वजनाचे हे नाणे अचानक कसे आढळून आले, हे अद्याप गूढच आहे. मात्र, येथून जवळच प्राचीन क्षेत्र सुरु होतेे आणि ती जागा येथून फारशी दूर नाही, ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत अशा प्रकारची केवळ तीनच इंद्रधनुषी नाणी ज्ञात आहेत.

Back to top button