58 लोकांचे शहर, सारेच कोट्यधीश! | पुढारी

58 लोकांचे शहर, सारेच कोट्यधीश!

न्यूयॉर्क : ट्रॅव्हेल वुईथ वाईजगाय या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यात मेनटोन या अनोख्या शहराचा उल्लेख करण्यात आला आहे आणि हे शहर यासाठी प्रसिद्ध आहे की, या शहरात केवळ 58 लोक राहतात व ते सारेच जण कोट्यधीश आहेत!

तसे पाहता, जगात असे अनेक ठिकाणे आहेत, जेथे मानवाचे वास्तव्य नाही. त्यामुळे, अशा ठिकाणांची एक तरी काहीही माहिती असत नाही आणि त्या जागा कायम अज्ञातच राहतात. अमेरिकेतील मेनटोन हे शहर देखील कदाचित याच श्रेणीत यावे. कारण, या शहरात फक्त 58 लोक राहतात आणि याहून आश्चर्य म्हणजे या प्रत्येक घराची कमाई चक्क कोट्यवधी रुपयात आहे.

जॉन वाईज या युट्यूबरने ही अनोखी जागा शोधून काढत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, मेनटोन शहर 1931 मध्ये विकसित झाले. अगदी 1967 मध्येही या शहरात केवळ 67 लोक रहायचे. त्यावेळी इथे अगदी पाणीही मिळणे कठीण असायचे. याशिवाय, ना येथे बँक होती, ना हॉस्पिटल, ना क्लब, ना शाळा! सध्या या शहरात पाणी जरुर मिळते. पण, अन्य सुविधा काहीच उपलब्ध होत नाहीत.

गतवर्षी 2022 मध्ये येथे प्रथमच एक कॅफे सुरू झाला. वाचून आश्चर्य वाटेल. पण, या शहरात आताही केवळ 58 लोक राहतात. आता शहर असतानाही येथे फक्त 58 लोकच कसे, असा प्रश्न पडेल. याचे कारण असे की, या ठिकाणाच्या आसपास ऑईल इंडस्ट्रीचे जाळे विणले गेले आहे आणि इथे जागा घेणे सर्वांनाच परवडत नाही. 2021 मधील येथील व्यावसायिकांचे उत्पन्न 95 कोटींच्या घरात होते. ते आता आणखी वाढले आहे. या हिशेबाने येथील जवळपास प्रत्येक व्यक्ती कोट्यधीश आहे.

Back to top button