वर्षाकाठी 10 कोटी रुपयांची कमाई करणारी यूट्यूबर! | पुढारी

वर्षाकाठी 10 कोटी रुपयांची कमाई करणारी यूट्यूबर!

लंडन : भारतात शासकीय प्राथमिक प्रशालांमधील शिक्षकांचे वेतन खासगी क्षेत्रातील शिक्षकांपेक्षा बरेच सरस असते. पण, ही मोठी जबाबदारी सांभाळतानादेखील वर्षाला कोटीच्या कोटी उड्डाणे निश्चितच घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत एखादी शिक्षिका प्रत्येक वर्षाला एक-दोन कोटी नव्हे, तर चक्क 10 कोटी रुपयांची कमाई करत असेल तर तो आश्चर्याचा धक्काच असणार आहे.

ब्रे थॉम्पटन असे या शिक्षिकेचे नाव आहे. ती एरवी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेच. पण, यावरच समाधान न मानता तिने अन्य काही पर्याय आजमावले आणि त्यात ती इतकी छान सेट झाली की, नोकरीचीही गरज राहिली नाही. आता ती छायाचित्रे, व्हिडीओ विकणे असे वगैरे अजिबात करत नाही. ती लहान मुलांना शिक्षण देण्याचेच काम करते. पण, यात तिने फक्त आपली पद्धत किंचित बदलली आहे.

मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रे थॉम्पटन एक यूट्यूब चॅनेल चालवते आणि त्यात मुलांची काळजी कशी घ्यावी, याचे धडे देते. तिचे व्हिडीओ बरेच लोकप्रिय झाले. आता या कारणामुळे तिला शाळेतील नोकरी गमवावी लागली. पण, तोवर तिची यूट्यूबच्या माध्यमातून कमाई सुरू झाली होती.

शाळेत कार्यरत असताना तिला पूर्ण वेळ काम करावे लागत असे. पण, आता ती कंत्राटी पद्धतीने काम करते. आता ती मुलांना शिकवते आणि त्यांना आर्थिक मदतही करते. ब्रे थॉम्पटन हिन, यावेळी आता आपण मुलांना शिकवण्याबरोबरच 11 विविध स्रोतांनी कमाई करत असल्याचे सांगितले. यामध्ये टिचिंग टूल्स, स्ट्रॅटेजी, रिसोर्सेसची विक्री करून ती अधिक पैसे मिळवते. यूट्यूब चॅनेलच्या प्रमोशनमधूनदेखील तिला बर्‍यापैकी पैसे मिळतात. यानंतर ती शेअर बाजारात पैसे गुंतवते. त्यापासूनही तिला उत्तम मोबदला मिळतो. याशिवाय, पठडीबाहेरचे म्हणजे ती क्रिप्टो करन्सीत धोके घेऊनही पैसे मिळवत असते.

Back to top button