संशोधकांनी पाहिली सर्वात प्रकाशमान घटना | पुढारी

संशोधकांनी पाहिली सर्वात प्रकाशमान घटना

न्यूयॉर्क : कमी कालावधीसाठी, पण ब्रह्मांडातील सर्वात प्रकाशमान अशी घटना अशावेळी घडते ज्यावेळी एखाद्या मृत तार्‍यावर लघुग्रह कोसळतो, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यांनी अशीच एक घटना अंतराळात पाहिली आहे. या घटनेला ‘फास्ट रेडियो बर्स्ट’ (एफआरबी) असे नाव देण्यात आले होते. हे प्रकाशाचे उत्सर्जन केवळ काही सेकंद टिकत असले तरी तो प्रकाश सर्वाधिक प्रखर असतो.

असा ‘एफआरबी’ संशोधकांना 2020 मध्ये पाहायला मिळाला होता. आपल्याच ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत तो दिसून आला. त्याचा स्रोत होता एक ‘मॅग्नेटर’. ‘मॅग्नेटर’ म्हणजे विशेष प्रकारचा न्यूट्रॉन तारा. एखाद्या मोठ्या तार्‍याचा स्फोट होऊन त्याचा मृत्यू झाला की असा मॅग्नेटर बनतो. त्यांचे चुंबकीय क्षेत्र अतिशय शक्तिशाली असते. पृथ्वीपेक्षा अब्जावधी पटीने अधिक मजबूत असे हे मॅग्नेटरचे चुंबकीय क्षेत्र असते. सर्व न्यूट्रॉन तार्‍यांप्रमाणेच मॅग्नेटर्सही अतिशय वेगाने फिरत असतात.

हा विशिष्ट मॅग्नेटर तर अवघ्या 3.9 सेकंदांमध्ये स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करीत होता. विशेष म्हणजे त्याचे वस्तुमान सूर्यापेक्षाही अधिक आहे. अशा मॅग्नेटरमधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते. आयर्न म्हणजेच लोहसंपन्न असा एक लघुग्रह अशाच मॅग्नेटरकडे खेचला जाऊन आदळला व त्यामधून काही क्षणांसाठी मोठा प्रकाश निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या
Back to top button