भिंगाने लाकूड जाळून बनवले कोहलीचे चित्र | पुढारी

भिंगाने लाकूड जाळून बनवले कोहलीचे चित्र

नवी दिल्ली : लहानपणी मॅग्निफायिंग ग्लासचा म्हणजेच भिंगाचा वापर करून आपण कधी तरी कागदाचा कपटा जाळलेला असतो. मात्र, या पद्धतीने कुणी चित्रेही बनवेल असे आपल्याला वाटले नव्हते. आपल्या देशात कलेची आणि कलाकारांची अजिबात कमतरता नाही. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या कलेसाठी ओळखले जाते. अशाच एका आगळ्या वेगळ्या कलाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे अनेक कलाकार आहे जे आपल्या आवडत्या सेलिबि—टीसाठी काही ना काही खास समर्पित करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कलाकाराने मॅग्निफायिंग ग्लास आणि लाकडाच्या तुकड्याचा वापर करून प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. कलाकाराची कलाकारी लोक पाहून आश्चर्यचकीत होत आहेत.

इंडियन आर्टिस्टस् क्लबच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केले आहे. या व्हिडीओला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विराट-आर्ट फ्रॉर्म सनलाईट’ कलाकार विग्नेशद्वारे पोस्ट केला गेला होता. व्हिडीओमध्ये कलाकाराने काही अंतरावर ठेवलेल्या लाकडाच्या फळीवर विराट कोहलीचे फोटो तयार करण्यासाठी त्याने मॅग्निफायिंग ग्लास म्हणजेच भिंगाचा वापर केला आहे. कलाकाराने भिंग वापर करून लाकडी फळीवर सूर्याच्या किरणांचा वापर केला आहे. त्याने लाकडू जाळून ही कलाकारी केली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक या कलाकाराचे कौतुक करत आहे. या व्हिडीओला 2.1 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिले गेले आहे. लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहे. विराटचे चाहते देखील सतत या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे.

Back to top button