‘या’ कारणासाठी विमानातील खिडक्यांच्या खाली असते छिद्र | पुढारी

‘या’ कारणासाठी विमानातील खिडक्यांच्या खाली असते छिद्र

नवी दिल्ली : हल्ली विमान प्रवास ही केवळ श्रीमंतांची मिरासदारी राहिलेली नाही. वेगवेगळ्या स्तरांतील अनेक लोक गरजेनुसार विमानप्रवास करीत असतात. त्यावेळी अर्थातच विमानातील अनेक गोष्टींकडे लक्ष जात असते. विमानामधील खिडक्या या गोल असतात आणि पूर्णपणे झाकलेल्या असतात; पण जर तुम्ही कधी विमानाच्या खिडक्यांच्या बाजूला बसला असाल, तर तुम्ही पाहिले असेल की, त्या खिडक्यांच्या खाली एक छोटेसे छिद्र असते. कदाचित तुम्ही कधी याकडे बारकाईने लक्ष दिले नसेल; पण तिथे छिद्र असते आणि ज्यांनी ते पाहिले असेल, त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच असा प्रश्न निर्माण झाला असेल की, हे छिद्र इथे कशाला आहे?

विमान उडत असताना बाहेरचे प्रेशर आत जाणवू नये म्हणून खिडक्या दरवाजे घट्ट बंद ठेवले जातात; पण मग असे असले तरी विमानांच्या खिडक्यांना असे लहान छिद्र का दिले जाते? व्यावसायिक फ्लाईटच्या (कमर्शियल फ्लाईट) खिडक्यांना एक लहान छिद्र दिले जाते. या छिद्राला ‘ब्लीड होल’ म्हणतात. केबिनच्या आतून विमानाच्या खिडक्यांवर जो दबाव टाकला जातो, हा दबाव नियंत्रित करण्यास या छिद्राची मदत होते. बहुतेक व्यावसायिक विमानांच्या खिडक्या काचेच्या बाह्य, मध्य आणि आतील थरांनी बनलेल्या असतात. या प्रकरणात, प्रवाशांचे संरक्षण करताना खिडकीच्या बाहेरील स्तरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खिडकीची बाहेरची काच आधी फुटते.

जे सहसा ऍक्रेलिकचे बनलेले असतात. विमानात राखण्यात येणारा जास्त हवेचा दाब हा प्रवाशांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने जरी गरजेचा असला तरी मात्र तो उंचावर उडणार्‍या विमानासाठी म्हणावा तितका सुरक्षित नसतो. म्हणूनच बाहेरील आणि विमानातील एका विशिष्ट प्रमाणात हवेचा संतुलित दाब राखावा म्हणून विमानाच्या खिडकीवर ती लहान लहान छिद्रे असतात. हे छिद्र विमानाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Back to top button