‘B’ vitamin : ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी… | पुढारी

'B' vitamin : ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी...

नवी दिल्ली : सध्या आपल्या सगळ्यांची जीवनशैली ही खूप झपाट्याने बदलते आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होताना दिसतो आहे. (‘B’ vitamin) त्यातून आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सही कमतरता असते. त्यामुळे आपल्यालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येत्या काही काळात आपल्यालाही आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून सध्या व्हिटॅमिन ‘बी’ ची कमतरता अनेकांमध्ये वाढताना दिसते आहे. आपल्याला आपल्या आहारात त्यामुळेच योग्य त्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक ठरणार आहे.

येत्या काही वाढते प्रदूषण, महागाई आणि जंकफूड याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. (‘B’ vitamin) तरुणांमध्येही व्हिटॅमिन्सची कमतरता वाढू लागली आहे. तेव्हा जाणून घेऊया की व्हिटॅमिन ‘बी’ ची कमतरता असली तर आपण कोणत्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. मुळात अनेकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरताही पाहायला मिळते. तेव्हा अशावेळी दह्याचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य ठरेल. यात कॅल्शियम आणि प्रोटिन असते. त्यातून तुम्ही दह्याची योग्य वेळ ठरवीत तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दह्यासोबतच तुम्ही बाकी अनेक पदार्थांचेही सेवन करू शकता.

दही ही व्हिटॅमिन बी (‘B’ vitamin) ची कमतरता पुरी करते; परंतु त्याचसोबतच सोयाबीनमधूनही तुम्हाला याचा फायदा मिळतो. यात नियासिन, बी 6 आणि फॉलेट असते ज्यातून तुमच्या आरोग्याला जास्त चांगला फायदा होतो. कडधान्ये, दूध, चणे, काळे हरभरे, मासेही यांचे सेवनही उपयुक्त ठरते. या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास थकवा येणे, त्वचा पिवळी पडणे. मुंग्या येणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे अथवा स्मरणशक्तीवर परिणाम होणे असे आजार उद्भवू शकतात.

.हेही वाचा 

Tomb of Alexander : कुठे आहे ‘जगज्जेता’ अ‍ॅलेक्झांडरचा मकबरा?

YouTube डाऊन! व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर यूजर्संना जाणवली समस्या 

 

Back to top button