YouTube डाऊन! व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर यूजर्संना जाणवली समस्या | पुढारी

YouTube डाऊन! व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर यूजर्संना जाणवली समस्या

पुढारी ऑनलाईन : जगभरात आज सकाळी YouTube डाऊन झाल्याने यूजर्संना व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करताना अडचणी आल्या. जगभरातील सर्व प्रमुख आउटेजचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या वेबसाइटने YouTube डाऊन झाल्याचे म्हटले आहे. या आउटेजबद्दल यूजर्संनी ट्विटरवर तक्रारी नोंदवल्या आहेत. YouTube डाऊन झाल्याचे हजारांहून अधिक रिपोर्ट Downdetector वर आले आहेत.

Google च्या मालकीच्या असलेल्या YouTube वर समस्या आल्याचे आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आणून देण्यात आले. पण हे आउटेज नेमके कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही यूजर्संनी ट्विट करत YouTube त्यांच्याकडे लोड होत नसल्याचे म्हटले आहे.

टेक कंपनी गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस YouTube Music मध्ये यूजर्ससाठी हल्लीच काही नवीन फिचर्स जोडण्यात आली आहेत. कंपनीने अॅपमध्ये ७ नवीन फिचर्स आणले आहेत. रिअल-टाइम लिरिक्स फीचरच्या मदतीने यूजर्सना गाण्यासोबत गाण्याचे बोलही स्क्रीनवर दिसणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button