‘या’ डायनासोरचा आवाज होता पक्ष्यांसारखा! | पुढारी

‘या’ डायनासोरचा आवाज होता पक्ष्यांसारखा!

टोकियो : संशोधकांना तब्बल 8 कोटी वर्षांपूर्वीच्या एका डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्मामध्ये त्याच्या कंठग्रंथी किंवा स्वरयंत्राचाही समावेश आहे. त्याच्या अभ्यासावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की या डायनासोरचा आवाज पक्ष्यांसारखा होता.

या डायनासोरचे शास्त्रीय नाव ‘पिनॅकोसॉरस ग्रँगेरी’ असे आहे. चिलखती त्वचा असलेला व वैशिष्टपूर्ण शेपटीचा हा डायनासोर होता. त्याचे जीवाश्म 2005 मध्ये मंगोलियामध्ये सापडले होते. उडू न शकणार्‍या डायनासोरपैकी हा एक होता व अशा डायनासोरच्या जीवाश्मामध्ये प्रथमच त्याचा ‘व्हॉईस बॉक्स’ (लॅरिंक्स) म्हणजेच कंठग्रंथी किंवा स्वरयंत्रही होते. त्यावर आता एक नवे संशोधन झाले आहे.

त्याची माहिती ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या डायनासोरचा आवाज नाजूक आणि लयबद्ध होता असे दिसून आले. एखाद्या पक्ष्याप्रमाणे गोड आवाजाचा हा डायनासोर होता! जपानमधील फुकुशिमा म्युझियममधील जंकी योशिदा यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button