मधुमेही बिनधास्तपणे खाऊ शकतात कच्ची केळी | पुढारी

मधुमेही बिनधास्तपणे खाऊ शकतात कच्ची केळी

नवी दिल्ली : केळी हे एक असे फळ आहे. त्याच्यातील महत्त्वाच्या गुणधर्मामुळे याला ऊर्जेचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. पिकलेले केळ हे गुणांनी परिपूर्ण असते. पण मधुमेही रुग्णांसाठी पिकलेली केळी अत्यंत हानिकारक ठरतात असे म्हटले जाते. वास्तविक, पिकलेले केळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण केळ्यांपासून अंतर राखणे पसंत करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की कच्च्या केळीमुळे साखर वाढण्याऐवजी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाचे रुग्णही कोणतीही काळजी न करता कच्ची केळी खाऊ शकतात, असे तज्ञांचे मत आहे.

कच्च्या केळ्यामध्ये भरपूर स्टार्च असते, जेव्हा केळी पिकते तेव्हा स्टार्च साखर (ग्लुकोज, सुक्रोज व फ्रक्टोज) मध्ये बदलते. यामुळेच कच्ची केळी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. पिकलेल्या केळ्यांप्रमाणेच कच्च्या केळ्यातही भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात भरपूर फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, तांबे आढळते. कच्ची केळी खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. कच्ची केळ्यांमध्ये फायबर मुबलक असते. यासोबतच जर एखाद्याला लठ्ठपणाचा त्रास असेल तर त्याच्यासाठी कच्ची केळी खाणे फायदेशीर ठरू शकते.

कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचा शरीरावर प्रीबायोटिक प्रभाव पडत असतो. याच्या वापरामुळे फुफ्फुसातील चांगले बॅक्टेरिया वाढून ते निरोगी राहण्यास मदत होते. यासोबतच कच्ची केळी खाल्ल्याने शॉर्ट चेन फॅटी ऍसिडचे उत्पादन वाढू शकते, जे पाचनतंत्रासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कच्ची केळी खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होण्यास मदत होते.

Back to top button