पाहा… झाशीच्या राणीची पत्रे, तुघलकी फर्मानही मोबाईलवर!

पाहा… झाशीच्या राणीची पत्रे, तुघलकी फर्मानही मोबाईलवर!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या दस्तऐवजाचा खजिना आता सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटलायझेशनमध्ये येत्या चार महिन्यांत भारत अमेरिकेलाही मागे टाकणार आहे. तुघलकी फर्मान, झाशीच्या राणीची पत्रे, मोगलांचे आदेश, इंग्रजांच्या काळातील दस्तऐवज अशी दुर्मीळ कागदपत्रे लवकरच मोबाईल व लॅपटॉपवर पाहायला मिळणार आहेत.

भारतीय अभिलेखागार लवकरच 34 कोटी दस्तऐवजांची डिजिटल कॉपी आपल्या वेबसाईटवर अपलोड करणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहालयात 10 कोटी दस्तऐवज डिजिटल आहेत. येत्या चार महिन्यांत भारत याबाबतीत अमेरिकेलाही मागे टाकणार आहे आणि डिजिटल दस्तऐवजात प्रथम स्थान मिळवणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news