‘या’ टरबूजची किंमत 20 लाख रुपये प्रतिकिलो | पुढारी

‘या’ टरबूजची किंमत 20 लाख रुपये प्रतिकिलो

टोकियो : जपानमध्ये अत्यंत महागडी फळेही पाहायला मिळतात. त्यामध्येच युबारी टरबूजचा समावेश होतो. हे जगातील सर्वात महागडे फळ आहे. त्याची किंमत इतकी आहे की त्या किमतीत लक्झरी गाडीही खरेदी करता येईल. विशेष म्हणजे जपानमधील श्रीमंत लोक इतक्या किमतीचे फळ खरेदी करून त्याचा स्वाद घेतातच. त्याची किंमत 20 लाख रुपये प्रति किलोही असते. हे टरबूज केवळ जपानमध्येच आढळते. त्यामध्ये अनेक मायक्रोन्युट्रिएंटस् आणि अँटिऑक्सिडंटस्ही असतात. एक ‘लक्झरी फ्रुट’ मानले जाणारे हे फळ सहजपणे उपलब्ध होत नाही. जपानमध्ये अत्यंत कमी प्रमाणातच त्याचे उत्पादन होते. त्यामुळे ते शक्यतो जपानबाहेर पाठवले जात नाही. त्याचे ग्रीनहाऊसमध्ये सूर्यप्रकाशात उत्पादन घेतले जाते.

सर्वात प्रथम त्याचे उत्पादन युबारी शहरात घेतले गेल्याने त्याला ‘युबारी टरबूज’ असे नाव पडले. तिथे या टरबूजसाठी पोषक वातावरण आहे. हे टरबूज अतिशय नाजूक असतात. त्यांच्या शेतीपासून साठवणुकीपर्यंत बरीच काळजीही घ्यावी लागते. उत्पादन झालेल्या टरबूजपैकी सर्वोत्तम टरबूजच विक्रीसाठी पाठवले जातात. हे टरबूज डिहायड्रेशन कमी करते, रोगप्रतिकारकशक्ती वाढवते तसेच उच्च रक्तदाबावरही गुणकारी ठरते. त्यामधील अँटिऑक्सिडंटस् कर्करोगाचा धोका कमी करतात.

Back to top button