सिंगापूरमध्ये दोनशे वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार | पुढारी

सिंगापूरमध्ये दोनशे वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार

सिंगापूर : येथे दोनशे वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांनी श्री मरिअम्मन मंदिराची उभारणी केली होती. या दाक्षिणात्य मंदिराचा आता जीर्णोद्धार करण्यात आला असून त्याच्या उद्घाटनासाठी वीस हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सिंगापूरचे उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचीही उपस्थिती होती. पावसाची तमा न बाळगता हे हजारो लोक मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले.

या मंदिराला सिंगापूरने राष्ट्रीय स्मारक घोषित केलेले आहे. मंदिराचा एक वर्ष जीर्णोद्धार सुरू होता. त्यानंतर रविवारी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यासाठी 26 लाख अमेरिकन डॉलर्सचा खर्च आला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारतातील बारा तज्ज्ञ पाचारण करण्यात आले होते. या बारा मूर्तीकारांनी तसेच सात धातू व लाकूड कारागिरांनी गाभारा, घुमट आणि छताच्या भित्तीचित्रांवर काम केले. मंदिराची मूळ रंग योजना व स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे.

वोंग यांनी रविवारी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की बहुसांस्कृतिक सिंगापूरमध्ये सर्व लोक एकमेकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये एकत्र येतात. आज सकाळी झालेल्या पावसाने श्री मरिअम्मन मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या वीस हजार लोकांचा उत्साह कमी झाला नाही. या समारंभात सहभागी झाल्याने आनंद वाटला!

संबंधित बातम्या
Back to top button