डोळ्यात फोडला फटाका | पुढारी

डोळ्यात फोडला फटाका

नवी दिल्ली : सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे की, ते कोणत्याही व्यक्तीला एका रात्रीत स्टार बनवू शकते. यासाठीच लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ टाकत असतात. यातील काही व्हिडीओ पाहणार्‍याला चकित करत असतात; मात्र असे व्हिडीओ तयार करताना लोक आपला जीवही धोक्यात घालत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एकाने केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी चक्क आपल्या डोळ्यात फटाका फोडला आहे. यामध्ये तो चांगलाच जखमी झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन हा हमखास असतोच. यातील बहुतेक लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात. तर इंटरनेट हे कोणालाही एका रात्रीत स्टार बनवू शकते. याच प्रसिद्धीसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्ये नृत्य, गाणे अशा अनेक प्रकारच्या व्हिडीओंचा समावेश असतो; मात्र कधी कधी असे व्हिडीओ तयार करण्यासाठी लोक आपला जीवही धोक्यात घालत असतात.

ट्विटवर तळलर्ळेीी तळवशेी नामक अकाऊंटवरून एक अजब व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्याच डोळ्यात चक्क फटाका लावला आहे. त्यानंतर ती व्यक्ती फटाका फोडताना दिसत आहे. फटाका फुटल्यानंतर संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचेही दिसून येत आहे. असा हा अत्यंत धोकादायक व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.

प्रसिद्धीसाठी करण्यात आलेले नको ते धाडस त्या व्यक्तीचा डोळाही निकामी करू शकले असते, पण फटाका फुटल्यानंतर नेमके काय झाले? याची मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Back to top button