रत्नागिरी : शृंगारतळीनजीक टायर फुटल्याने ट्रक उलटला; दोन महिलांचा मृत्यू

रत्नागिरी : शृंगारतळीनजीक टायर फुटल्याने ट्रक उलटला; दोन महिलांचा मृत्यू

गुहागर,  शहर पुढारी वृत्तसेवा : गुहागर-विजापूर मार्गावरील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बरमारे नर्सरी जवळ ट्रकचा पाठिमागील टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. पार्वती विठ्ठल मानसुंगि-पाटिल (वय-४७) व कविता गंगाराम राठोड (वय-३०) असे मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. त्या विजापूर सद्या रा. चिपळूण खेर्डी येथील रहिवासी आहेत.

दोन महिलांचा मृत्यू

माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बरमारे येथील नर्सरी जवळ ७०९ गाडीचा मागील टायर फुटल्याने  भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच दोन महिला ठार झाल्या. गाडीत वाहनचालकासह ११ जण होते. हे सर्वजण खेर्डी चिपळूण वरून गुहागरकडे स्लॅब टाकण्यासाठी निघाले होते. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी गुहागरच्या दिशेने निघालेली असताना सदर गाडी उलट दिशेला रस्त्यावर पलटी झाली. यावेळी गाडीतील पुरुषांनी गाडी पलटी झाल्याबरोबर गाडीतुन उड्या मारल्या मात्र महिला  गाडीमध्ये अडकल्या. त्यांच्या छाती वरती मिक्सर मशीन पडल्यामुळे त्या गाडीतच मृत्यूमुखी पडल्या.

हा अपघात सकाळी ८.३० दरम्यान घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त गाडी क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहे. तर अपघातामध्ये मयत दोन्ही महिलांना चिखली आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेने नेण्यात आले. घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news