‘नासा’चा निकामी उपग्रह 38 वर्षांनी परतला पृथ्वीवर | पुढारी

‘नासा’चा निकामी उपग्रह 38 वर्षांनी परतला पृथ्वीवर

वॉशिंग्टन : ‘नासा’चे एक निवृत्त व निकामी झालेले सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह आता 38 वर्षांनंतर पृथ्वीवर परत आले आहे. फारशी कोणतीही हानी न होता ते सुरक्षितपणे अलास्कामध्ये कोसळले. ‘नासा’कडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 1984 मध्ये हा सॅटेलाईट अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून लाँच करण्यात आले होते.

या सॅटेलाईटला ‘अर्थ रेडिएशन बजेट सॅटेलाईट’ (ईआरबीएस) म्हणून ओळखले जाते. ‘चॅलेंजर’ या अंतराळयानाच्या माध्यमातून त्याला अंतराळात सोडण्यात आले होते. अंतराळवीरांगना शेली राईड या उपग्रहासह यानातून अंतराळात रवाना झाली होती. या सॅटेलाईटच्या मदतीने 2005 पर्यंत अनेक प्रकारची माहिती मिळवली गेली. पृथ्वी कशाप्रकारे सूर्याची ऊर्जा ग्रहण करते आणि पुन्हा ती उत्सर्जित करते हे या सॅटेलाईटच्या माध्यमातून पाहिले गेले.

तसेच पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा स्तर, बाष्प, नायट्रोजन डायऑक्साईड आणि एरोसोल सांद्रता यांचेही मोजमाप करण्यासाठी या सॅटेलाईटचा वापर झाला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडूनही सांगण्यात आले की हे सॅटेलाईट पृथ्वीवर आल्याचे सांगण्यात आले. बहुतांश सॅटेलाईट ज्यावेळी पुन्हा पृथ्वीवर परत येतात त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात शिरताच पूर्णपणे जळून खाक होतात. मात्र, या सॅटेलाईटचे फारसे नुकसान झालेले नाही.

Back to top button