Wuhan Laboratory China : वुहान प्रयोगशाळेतूनच फैलावला कोरोना : ‘या’ संशोधकाचा दावा | पुढारी

Wuhan Laboratory China : वुहान प्रयोगशाळेतूनच फैलावला कोरोना : 'या' संशोधकाचा दावा

वॉशिंग्टन : डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा फैलाव झाला आणि त्यावेळेपासून अद्याप जग या विषाणूचा सामना करीत आहे. हा विषाणू नेमका कुठून फैलावला याबाबत उलटसुलट दावे करण्यात आले आणि त्याबाबत अद्यापही ठोस माहिती समोर आलेली नाही. चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच (Wuhan Laboratory China) हा विषाणू ‘लीक’ झाला व त्याचा फैलाव होत गेला असे म्हटले जाते. आता या दाव्याची एका अमेरिकन वैज्ञानिकाने पुष्टी केली आहे.

अँड्र्यू हफ नावाच्या या वैज्ञानिकाने आपल्या ‘द ट्रूथ अबाउट वुहान’ या पुस्तकात याबाबतचा दावा केला आहे. अमेरिकन सरकारही चीनमध्ये कोरोना विषाणू (Wuhan Laboratory China) बनवण्याच्या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत होती असेही त्यांनी म्हटले आहे. हफ यांनी स्वतः या प्रयोगशाळेत काम केले आहे.

कोरोना संक्रमणाचे आतापर्यंत जगभरातून 65 कोटी प्रकरणे समोर आलेली आहेत. ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूमुळे होणार्‍या ‘कोव्हिड-19’ या आजाराने आतापर्यंत जगभरात 66 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हफ यांचे म्हणणे आहे की वैज्ञानिकांनी विकसित केलेला कोरोना विषाणू वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (Wuhan Laboratory China) (डब्ल्यूआयव्ही) या प्रयोगशाळेतून लीक झाला होता. या लॅबला चिनी सरकार निधी देते. हफ यांचा दावा आहे की सुरक्षेत चूक झाल्याने हा विषाणू लीक झाला आणि काही दिवसांमध्येच तो जगभर फैलावला.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच वुहान लॅबकडे संशयाने पाहिले जात आहे. या लॅबमधून कोरोना लीक (Wuhan Laboratory China)  होण्याबाबतचे अनेक थेअरी समोर आल्या आहेत. या लॅबमध्ये काम करणारे संशोधक विशेषतः कोरोना विषाणु व त्याच्या विविध व्हेरिएंटस्वर संशोधन करतात. त्यामुळे एखाद्या संशोधकाकडूनच या विषाणूचे संक्रमण फैलावले गेले असल्याची शंका अनेकांना वाटते.

मात्र, चिनी सरकार आणि वुहान लॅबने हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत. कोरोना महामारीसाठी हफ यांनी अमेरिकन सरकारलाही जबाबदार धरले आहे. याचे कारण म्हणजे कोरोना विषाणूवर होत असलेल्या संशोधनाला अमेरिकेच्या मेडिकल रिसर्च एजन्सी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चा (एनआयएच) पाठिंबा होता. याच संस्थेने चीनला विषाणू (Wuhan Laboratory China)  बनवण्याचे तंत्रज्ञान दिले होते. हे एखाद्या जैविक अस्त्रापेक्षा कमी नव्हते.

हफ यांचे म्हणणे आहे की हा एखादा नैसर्गिक विषाणू नाही हे चिनी सरकारला पहिल्या दिवसापासूनच माहिती होते. त्याला जनुकीय सुधारणा करून (जेनेटिकली मॉडिफाय) बनवण्यात आले होते. त्यामुळेच तो लॅबमधून (Wuhan Laboratory China)  लीक झाला. त्यानंतरही सुरक्षा आणि लोकांना सावध करण्याबाबत ढिसाळपणा करण्यात आला. ही महामारी सुरू झाली आहे याबाबतच चीन खोटे बोलला असे नाही तर हा विषाणू नैसर्गिक असल्याचे सिद्ध करण्यासाठीही आटापिटा केला. आश्चर्य म्हणजे अमेरिकन सरकारही जगाशी खोटे बोलले, असे हफ यांनी म्हटले आहे.

हफ यांनी 2014 ते 2016 पर्यंत ‘इको-हेल्थ अलायन्स’मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ही कंपनी गेल्या दहा वर्षांपासून ‘एनआयएच’कडून निधी घेत वटवाघळांमधील अनेक प्रकारच्या कोरोना विषाणूंबाबत संशोधन करीत आहे. या कंपनीचे आणि वुहान लॅबचे (Wuhan Laboratory China) जवळचे संबंध आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच इको-हेल्थ अलायन्सने हा विषाणू नैसर्गिकरीत्या प्राण्यांमधून माणसात संक्रमित झाल्याचे सांगितले आहे. या सिद्धांताला ‘एनआयएच’नेही समर्थन केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button