तब्बल दहा कोटींचा रेडा! | पुढारी

तब्बल दहा कोटींचा रेडा!

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तब्बल दहा कोटी रुपयांचा रेडा पाहायला मिळत आहे. सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाचा कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तिथे या रेड्याला आणण्यात आले आहे. हरियाणाच्या पानीपतहून हा रेडा या मेळाव्यात आला आहे. या रेड्याचे नाव गोलू आहे.

रेड्याचे मालक नरेंद्र सिंहने सांगितले की या रेड्याची किंमत दहा कोटी रुपये लागली आहे. त्याचा खाणं-पिणं आणि देखभालीत महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. हा रेडा दररोज 25 लिटर दूध, 15 किलो फळे, 15 किलो दाणे आणि 10 किलो मटार खातो. याशिवाय त्याला हिरवा चाराही दिला जातो. दररोज संध्याकाळी त्याला 6 कि.मी. अंतर फिरवलं जातं. त्याच्या शरीराला दररोज तेलाने मालिश केली जाते. या रेड्यामुळे मिळणारे उत्पन्नही खूप आहे.

या रेड्याचे वीर्य विकून मालक दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो. हरियाणाशिवाय पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह बर्‍याच राज्यांत या रेड्याच्या विर्याला मागणी आहे. मेळाव्यात या दहा कोटींच्या रेड्यासोबच सेल्फी घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. याआधी हरियाणातील कुरूक्षेत्र जिल्ह्यातील करमवीर सिंहचा सव्वा नऊ कोटींचा रेडा ‘युवराज’ आला होता.

Back to top button