पृथ्वीवर परतताच अंतराळ प्रवाशांना दिले जाते ‘हे’ फळ | पुढारी

पृथ्वीवर परतताच अंतराळ प्रवाशांना दिले जाते 'हे' फळ

कॅलिफोर्निया : अंतराळयात्री ज्यावेळी अवकाशात राहतात, त्यावेळी ते काय खातात आणि ते पृथ्वीवर परतल्यानंतर काही दिवस त्यांना काय खावयास दिले जाते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. पृथ्वीवर आपण प्रत्येक पदार्थाची चव चाखू शकतो, आरामात झोपू शकतो; मात्र असे अंतराळात काहीच होत नाही.

अवकाशात राहून जेव्हा अंतराळ यात्री पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांच्यासमोर खाण्या-पिण्याची मोठी समस्या येत असते. यामुळे मनात असूनही ते काही प्रकारचे पदार्थ खाऊ शकत नाहीत. सुरुवातीच्या दिवसात जे योग्य आहे, तेच त्यांना खावे लागते. यामुळे अंतराळात राहून पृथ्वीवर परतताच ते पिझ्झा, बर्गर असे चटकदार पदार्थ खाऊ शकत नाहीत. सुरुवातीला त्यांना एकदम कडक डायट पाळावे लागते.

अंतराळयात्रींना अवकाशात सुके आणि फ्रिझमधील अन्नच खावे लागते. पाणीही जास्त पिऊ शकत नाहीत. याची त्यांच्या पोटाला सवय झालेली असते. यामुळे पृथ्वीवर परत येताच त्यांना प्रथम अनेक मेडिकल चेकअपला सामोरे जावे लागते. सुरुवातीला निंबू पाणी अथवा पाणी दिले जाते. त्यानंतर त्यांना सर्वप्रथम खाण्यासाठी ताजे सफरचंद मिळते, जेणेकरून ते सहजपणे पचले जाईल. काहींना सफरचंदऐवजी आंबा अथवा दुसरी फळे खाण्यासाठी दिले जाते. त्यानंतर त्यांना पचतील तसेच भात व अन्य पदार्थ दिले जातात; मात्र त्यांना लागलीच हर्बल अथवा ग्रीन टी दिली जात नाही.

Back to top button