जगातील सर्वात लांब सस्पेन्शन फूट ब्रीज | पुढारी

जगातील सर्वात लांब सस्पेन्शन फूट ब्रीज

लंडन : झेक प्रजासत्ताकमध्ये जगातील सर्वात लांब सस्पेन्शन फूटब्रीज आहे. नुकताच तो पर्यटकांसाठी खुला झाला आहे. या सस्पेन्शन फूटब्रीजची लांबी तब्बल 721 फूट इतकी आहे. या झुलत्या पुलाचे बांधकाम दोन वर्षे सुरू होते.

या पुलाचे नाव ‘स्काय ब्रीज 721’ असे आहे. जेसेन्की पर्वतावर दोन कड्यांना जोडणारा हा भव्य पूल आहे. 312 फूट उंचीच्या दोन पर्वतकड्यांना जोडणार्‍या दरीवर हा पूल आहे. या पुलावर ‘वन वे वॉक’ करण्यात आला असून तेथून पर्यटक जंगलात पोहोचतील. पुलाची रुंदी 1.2 आहे. हा पूल बांधण्यासाठी 200 दशलक्ष क्राऊन खर्च करण्यात आले. त्याची किंमत भारतीय चलनात सुमारे 64 कोटी रुपये आहे.

याआधी नेपाळचा बागलुंग पर्वतावरील सस्पेन्शन फूटब्रीज सर्वात लांब होता. आता हा विक्रम झेक प्रजासत्ताकच्या या पुलाने मोडला आहे. हा पूल समुद्रसपाटीपासून 3610 फूट उंचीवर बांधण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button