50 डॉक्टरांंनी केली 48 तास शस्त्रक्रिया | पुढारी

50 डॉक्टरांंनी केली 48 तास शस्त्रक्रिया

लखनौ : डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानले जाते. याचा प्रत्यय लखनौमध्ये नुकताच आला. येथील ‘अपोलोमेडिक्स’ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अत्यंत किचकट शस्त्रक्रिया करून केवळ रुग्णाचे प्राणच वाचविले नाही तर त्याची नजरही परत मिळवून दिली. यासाठी 50 डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 48 तास शस्त्रक्रिया केली.

एमआरआईच्या माध्यमातून रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये ‘एन्यूरिज्म’ झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तिच्या डोळ्यांची द़ृष्टीही गेली होती. वेळेवर शस्त्रक्रिया झाली नसती तर या महिलेच्या मेंदूत एन्यूरिज्म फुटला असता आणि महिलेच्या प्राणावरही बेतू शकले असते.

ब्रेन एन्यूरिज्म म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांची एक प्रकारची गाठच म्हणावी लागेल. हा एक अत्यंत असाध्य आजार मानला जातो. यामध्ये संबंधित रुग्णाला दिसणे बंद होते. कधी कधी ही गाठ गोल्फ चेंडूच्या आकाराचीही असू शकते.

संबंधित बातम्या

न्यूरो सर्जन व कार्डियाक सर्जन या सर्वांनी एकत्रपणे चार चरणात रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया केली. 50 डॉक्टरांनी तब्बल 48 तास ही शस्त्रक्रिया केली. मात्र, एन्यूरिज्म मोठे असल्याने रुग्णाच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन बंद करणे आवश्यक होते. यासाठी रुग्णाच्या शरीरातील सर्व रक्त काढण्यात आले. यादरम्यान रुग्णाच्या हृदय आणि फुफुस्सांना हार्ट अँड लंग मशिनच्या मदतीने रक्त पुरविण्यात आले. 50 डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 48 तास केलेले परिश्रम यशस्वी ठरले आणि महिलेचे प्राण वाचले.

Back to top button