Aliens : एलियन्स बनतात तरी कसे?

Aliens : एलियन्स बनतात तरी कसे?

वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजे परग्रहवासी. खरे तर एलियन्समध्ये अगदी सूक्ष्म जीवांपासून मोठ्या जीवांपर्यंत कोणत्याही सजीवाचा समावेश होऊ शकतो. मात्र आपल्याला 'एलियन्स' म्हणजे माणसासारखे वावरणारे प्रगत जीवच डोळ्यांसमोर येतात. अर्थात एलियन्स आहेत की नाहीत हेच अद्याप समजलेले नाही व त्याचा शोध अद्याप सुरूच आहे. मात्र हे एलियन्स काय करू शकतात, कुठे असू शकतात यापासून ते त्यांची निर्मिती कशी होत असावी, यापर्यंत अनेक कयास लावलेले आहेत. एलियन्सची निर्मिती ही माणूस जसा जन्मतो तशी होत नसावी, असे काही संशोधकांना वाटते!

एलियन्सच्या निर्मितीबाबतच्या अशा दाव्यामुळे अवकाश आणि त्यातील रहस्यांबद्दलचं कुतूहल आणखी वाढलं आहे. या संशोधनानुसार पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाली, त्याप्रमाणे एलियन्सची निर्मिती झालेली नाही. एलियन्स निर्माण होण्याची प्रक्रिया मानवाच्या निर्मिती प्रक्रियेपेक्षा वेगळी असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार मातेच्या पोटात मानवाची निर्मिती होते, त्याप्रकारे एलियन्सची निर्मिती होत नाही. एलियन तयार होण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्पत्तीपेक्षा वेगळी असू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर, मानवाच्या शरीरात प्रक्रिया घडून भ्रूण तयार होतं म्हणजे मानवाची उत्पत्ती होते. मात्र, एलियन्सची निर्मिती वातावरणातील रासायनिक प्रक्रियेमुळे होऊ शकतो, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ बेतुल काकर यांनी सांगितलं की, आपण सर्व शक्यतांचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे फक्त पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्तीबाबतच नाही तर सर्व ग्रहांवरील सर्व प्रकारचे जीव आणि जीवसृष्टी याबाबतच्या रहस्यांवरील पडदा उघडेल. आपोआप घडणार्‍या रासायनिक प्रक्रियांमुळे एलियन्सची निर्मिती म्हणजे जन्म होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अभ्यासाद्वारे, एलियन हे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या घटकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असलेल्या घटकांपासून बनलेले आहेत का आणि असल्याचं ते घटक कोणते हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे वेगळे घटक एलियन्सला त्यांच्या ग्रहावर राहण्यास कशाप्रकारे सक्षम बनवतात आणि ते पृथ्वीवरील वातावरणात जिवंत राहू शकतात की नाही याबाबत हे संशोधन आहे. एका अहवालानुसार, पृथ्वीवरील जीव सेंद्रिय संयुगांवर अवलंबून आहेत. कार्बन व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनसारख्या घटकांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पर्यायी रासायनिक संरचनेमुळे परकीय जीवांचा जन्म होऊ शकतो. शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून रसायनशास्त्राच्या आधारे परग्रहावरील जीवसृष्टी विकसित होऊ शकते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news