कांदेपोहे आरोग्याला लाभदायक | पुढारी

कांदेपोहे आरोग्याला लाभदायक

मुंबई : आपल्याकडे पाहुणे घरी आले की कांदेपोहे हा चटपटीत नाश्ता बनवला जात असतो. अनेक वेळा सकाळच्या न्याहरीसाठीही घरोघरी पोहेच असतात. कांदे-बटाटे, शेंगदाणे घालून बनवलेले हे पोहे चवीसाठीच चांगले असतात असे नाही तर ते आरोग्यासाठीही लाभदायक ठरतात.

पोहे हे अनेक पोषक घटकांनी भरलेले असतात. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेटस्, प्रोटिन, फायबर, जीवनसत्त्वे आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे अनेक प्रकारे लाभदायक ठरतात. पोह्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने ते पचनसंस्थेसाठी तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्‍त ठरतात. पोहे खाल्ल्यानंतर बराच काळ भूक लागत नाही व पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अतिरिक्‍त खाणे टाळले जाऊन वजन नियंत्रणात राहते.

भूक कमी लागते व रक्‍तदाबही नियंत्रणात राहतो. पोह्यांमुळे साखरेचे प्रमाण वाढत नाही. शरीरातील हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारकशक्‍ती वाढते. त्यामुळे पेशींना ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळतो. पोह्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी असते व त्यामुळे ते पचण्यासाठी सोपे असतात. पोटाचे विकार असणार्‍या रुग्णांसाठी पोहे लाभदायक असतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Back to top button