‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने वाढू शकते कोरोनाचे संकट | पुढारी

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने वाढू शकते कोरोनाचे संकट

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या संकटाविरुद्ध सध्या संपूर्ण जग संघर्ष करत आहे. जे पहिल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत, असे लोक मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेनेही कोरोनाचा धोका वाढू शकतो.

व्हिटॅमिन डी हे ‘हार्मोन’ आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर आपली त्वचा या हार्मोनची निर्मिती करते. तसेच व्हिटॅमिन डी हे मानवी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रित करत असते. हे दोन्ही घटक हाडे, दात आणि मांसपेशी आरोग्यदायी  व तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्‍त असतात. 

‘जेएएमए नेटवर्क ओपेन’ नामक पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोरोना आणि व्हिटॅमिन डी यांच्यात थेट संबंध असल्याचे आढळून आले. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीशी संबंधित व या संशोधनाचे प्रमुख डेविड मेल्टजर यांनी सांगितले की, आमच्या संशोधक पथकाने सुमारे 487 रुग्णांवर संशोधन करून वरील निष्कर्ष काढला आहे. या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण मोजण्यात आले. ज्यांच्यात या प्रोटीनचे प्रमाण कमी होते, त्यांना कोरोनाचा धोका दुप्पट असल्याचे निष्पन्‍न झाले.

Back to top button