उंदराला देण्यात आले सुवर्णपदक! | पुढारी | पुढारी

उंदराला देण्यात आले सुवर्णपदक! | पुढारी

श्‍वानपथकातील अनेक श्‍वान मोठी कामगिरी बजावत असतात. त्यांना सन्मानितही करण्यात येत असते. अशाच प्रकारे एखाद्या उंदरालाही सन्मानित केले जाईल याची आपण कल्पना करू शकत नाही. मात्र, बि—टनमध्ये असे घडले आणि तिथे एका उंदराला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. 

बि—टनमध्ये प्राण्यांशी संबंधित कार्य करणार्‍या ‘पीडीएसए’ या संस्थेने आफ्रिकन उंदीर ‘मगावा’ याला त्याची बहादुरी आणि कर्तव्यपालनातील समर्पणाबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित केले. लोकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणार्‍या अनेक प्राण्यांना सन्मानित केले जाते तसेच या उंदरालाही करण्यात आले.

मगावा उंदराला बेल्जियममधील ‘एपीओपीओ’ या चॅरिटी संस्थेने प्रशिक्षण दिले आहे. त्याने कंबोडियामध्ये 39 सुरुंग व 28 स्फोटकांचा छडा लावला. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकले. त्यामुळे त्याला हे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. आतापर्यंत या पदकाने तीस प्राण्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये मगावा हा पहिलाच उंदीर आहे. त्याला ‘हीरो रॅट’ असा किताबही देण्यात आला आहे.

 

Back to top button