मानवी शरीराचे घटतेय तापमान | पुढारी | पुढारी

मानवी शरीराचे घटतेय तापमान | पुढारी

 नवी दिल्ली :

पृथ्वीचे तापमान वर्षागणिक वाढत असले, तरी मानवी शरीराचे तापमान घटत चालले आहे, अशी खळबळजनक माहिती एका नव्या संशोधनातून मिळाली आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनात असेही स्पष्ट झाले आहे, की मानवाचे तापमान आता 98.6 अंश फॅरेनाईट इतके राहिलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे हे तापमान ग्रामीण भागातही बदलत आहे. बोलिव्हीयात एकूण 16 वर्षांदरम्यान अनेक लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे.  हे संशोधन सायन्स अ‍ॅडव्हान्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

कार्ल यांनी निश्‍चित केले होते तापमान

जर्मनीचे डॉक्टर कार्ल रेनहोल्ड अ‍ॅगस्ट वंडरलिच यांनी 1851 मध्ये क्‍लिनिकल थर्मामीटरच्या उपयोगासाठी तापमानाचे मानक तयार केले. यावेळी त्यांनी लाखोवेळा सुमारे 25 हजार लोकांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली. त्यानंतर त्यांचे एक संशोधन 1868 मध्ये एका पुस्तकात प्रसिद्ध झाले. यामध्ये कार्ल यांनी मानसाच्या शरीराचे सामान्य तापमान सरासरी 98.9 अंश फॅरेनाईट असते, असे सांगितले. काही वर्षांनंतर झालेल्या संशोधनात सरासरी तापमान वेगवेगळे असते आणि ते सरासरी 97.7 अंश, 97.9 आणि 98.2 अंश फॅरेनाईट इतके असते, असे सांगण्यात आले. आता यासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनातील माहितीनुसार अमेरिकन नागरिकांच्या शरीराचे तापमान गेल्या दोन शतकांपासून सातत्याने घटत आहे. 

बोलिव्हीयन अ‍ॅमेझॉनच्या सिमाने लोकांवर संशोधन

यापूर्वी झालेल्या संशोधनात मानवी शरीराचे सामान्य तापमान का घटत आहे, याबद्दल माहिती सांगण्यात आली नव्हती. मात्र, नव्या संशोधनात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या संशोधनासाठी बोलिव्हियातील अ‍ॅमेझॉन क्षेत्रामध्ये राहणार्‍या गरीर आणि मागासलेल्या सिमाने जनजातीच्या 5500 लोकांच्या शरीराचे 18 हजारवेळा तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णकटिबंधात राहत असल्याने या लोकांना थंड आणि निमोयिनाची सवय असणार असे वाटत होते, तसेच त्यांच्यात उष्णता आणि टीबीसारखे आजारही नव्हते, की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे संशोधकांना सिमाने लोकांचे तापमान यूएस, यूके अथवा जर्मन लोकांच्या तुलनेत जास्त असेल, असे वाटले.

प्रतिवर्षाला घटत  आहे तापमान

मात्र, खळबळजनक बाब म्हणजे सिमाने लोकांच्या शरीराचे तापमान प्रतिवर्षाला 0.009 अंश फॅरेनाईटने कमी होत चालल्याचे निदर्शनास आले. त्यांचे सरासरी तापमान 97.7 अंश असल्याचे आढळले. हा घट केवळ दोन दशकांतील होता. सध्या  लोकांमध्ये असलेली स्वच्छतेबद्दलची जागृती, उपलब्ध होत असलेल्या चांगल्या आरोग्य सोयी व अन्य कारणांमुळे संसर्ग कमी होत चालला आहे. यामुळेच त्यांच्या शरीराचे तापमानही कमी होत चालले आहे. 

Back to top button