‘जादू की झप्पी’ ठरते परिणामकारक! | पुढारी

‘जादू की झप्पी’ ठरते परिणामकारक!

लंडन ः ‘मुन्नाभाई’ने चित्रपटातून ‘जादू की झप्पी’चे महत्त्व दाखवून दिले होते. अर्थातच हे केवळ चित्रपटापुरतेच मर्यादित नसून वास्तव जीवनातही तितकेच खरे आहे. कठीण स्थितीत जर एखाद्या आप्तस्वकीयाने आलिंगन दिले तर तणाव कमी होऊन सुरक्षेची भावना निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषतः पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अशा आलिंगनाचा अधिक चांगला प्रभाव पडतो.

याबाबत 76 महिलांची एक पाहणी करण्यात आली. यामध्ये असे दिसून आले की, एखाद्या नातलगाने किंवा प्रिय व्यक्तीने तणावाच्या स्थितीत जर संबंधित महिलेस आपल्या कवेत घेतले तर तिच्यामधील तणावाला कारणीभूत ठरणार्‍या कार्टिसोल नावाच्या हार्मोनचा स्त्राव कमी होतो.

एखाद्या पुरुषाने आलिंगन देण्यापेक्षा महिलेने वात्सल्याने किंवा ममतेने असे आलिंगन दिल्यावरही अधिक परिणाम दिसून येतो. याबाबत अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना विद्यापीठाने एक पाहणी केली. संशोधकांनी म्हटले आहे की, कोर्टिसोल हे हार्मोन स्मरणशक्तीवरही प्रभाव टाकू शकते; जे तणावपूर्ण कार्याला अधिकच कठीण बनवू शकते. एखाद्या व्यक्तीने स्नेहपूर्ण पद्धतीने आलिंगन दिल्यास ऑक्सिटोसीन नावाच्या हार्मोनची निर्मिती होते. ते कोर्टिसोलचा प्रभाव कमी करते.

संबंधित बातम्या

हेही वाचलंत का?

Back to top button